• Thu. Oct 15th, 2026

Satyavartabharat Live 24x7

India #1 News Platform लेटेस्ट व ब्रेकिंग न्यूज | हिन्दी समाचार | यूपी न्यूज

आत्मा मालिक कुस्ती केंद्रात १०१ कुस्तीपटूंना हास्ययोगाचे धडे

Spread the love

कुस्ती, ध्यान आणि हास्ययोगाच्या त्रिवेणी संगमातून सकारात्मकतेचा संदेश

कोकमठाण प्रतिनिधी अमर पठारे 09सप्टेंबर 2026: आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण येथे महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आयोजित विशेष पूजा व आध्यात्मिक कार्यक्रमात लॉफ्टर ॲम्बेसेडॉर तथा लॉफ्टर योगा लिडर श्री. डी. जी. पाटील सर यांना प्रमुख पाहुणे म्हणून विशेष आमंत्रित करण्यात आले होते.

युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी साहेब यांचे निकटवर्तीय सहकारी तथा राष्ट्रीय मार्गदर्शक श्री. डी. जी. पाटील सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रेरणादायी उपक्रम पार पडला.

यावेळी कुस्ती केंद्रातील तब्बल १०१ कुस्तीपटूंना हास्ययोगाचे महत्त्व, त्याचे शारीरिक व मानसिक फायदे तसेच सकारात्मक जीवनशैलीतील त्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर डी. जी. पाटील सर यांनी कुस्तीपटू मुलांसोबत प्रत्यक्ष हास्ययोगाचे प्रात्यक्षिक घेतले. सर्व कुस्तीपटूंनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

“शरीर मजबूत करण्यासाठी कुस्ती आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी हास्ययोग” हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. नियमित व्यायाम, कुस्ती, ध्यान आणि हास्ययोगाच्या माध्यमातून युवा पिढीने शारीरिकदृष्ट्या सक्षम, मानसिकदृष्ट्या सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण बनावे, असा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला.

आत्मा मालिक बाबांच्या आरतीने भक्तिमय वातावरण

कार्यक्रमाच्या प्रारंभी आत्मा मालिक बाबांची आरती करण्यात आली. त्यानंतर सामूहिक ध्यानधारणा करण्यात आली. अध्यात्म, कुस्ती, व्यायाम आणि हास्ययोग यांचा सुंदर संगम झाल्याने संपूर्ण वातावरण प्रसन्न, सकारात्मक आणि ऊर्जादायी झाले होते.

आत्मा मालिक कुस्ती केंद्रातील अनेक होतकरू कुस्तीपटू जिल्हा स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत आपल्या उत्कृष्ट कामगिरीने केंद्राचे नाव उज्ज्वल करीत आहेत. या खेळाडूंना कुस्ती केंद्राचे संचालक भरत नायकल सर, विवेक नायकल, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक अक्षय डागे (NIS Coach) तसेच राजेंद्र पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व प्रशिक्षकांचा गौरव

५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे निमित्ताने कुस्ती केद्राचे संचालक राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्काराने गौरव झालेले गुरुवर्य भरत नायकल याचा यथोचित सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला औचित्य साधून कुस्ती केंद्रातील शिक्षक व प्रशिक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे शिक्षक आणि प्रशिक्षक हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्मितीचे शिल्पकार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

कुस्तीपटूंना घडविणाऱ्या सर्व गुरुजनांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. देशासाठी सक्षम खेळाडू घडविणाऱ्या आत्मा मालिक कुस्ती केंद्रात हास्ययोगाचा आनंद, आरोग्याचा संदेश, ध्यानाची शांतता आणि गुरुजनांचा सन्मान असा सुंदर त्रिवेणी संगम घडून आला.

१०१ कुस्तीपटू, कुस्तीचे संस्कार, हास्ययोगाची ऊर्जा, ध्यानाची शांतता आणि आत्मा मालिक बाबांचे आशीर्वाद यामुळे हा कार्यक्रम सर्वांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला. आरोग्य, सकारात्मकता, आनंद आणि संस्कारांचा संदेश देणारा हा उपक्रम निश्चितच आदर्श ठरला.

डी. जी. पाटील सर
लॉफ्टर ॲम्बेसेडॉर | लॉफ्टर योगा लिडर
राष्ट्रीय मार्गदर्शक, युवा क्रांती महाराष्ट्र पोलीस मित्र यांनी संपूर्ण माहिती पश्चिम महाराष्ट्र मिडिया प्रमुख श्री. अमर शिवाजी पठारे यांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *