बाप्पांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत सेवा, सुरक्षा आणि सामाजिक उपक्रमांचा जागर; महिला तक्रार समितीचीही स्थापना

महाराष्ट्र : प्रतिनिधी अमर पठारे
गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा, उत्साह आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव म्हणून महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सवाच्या कालावधीत युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलिस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धार्मिक सहभागासोबतच विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनजागृतीपर उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली.
१४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत कोपरगाव, पुणे, मुंबई, जळगाव, शिरपूर, धुळे, नाशिक यांसह महाराष्ट्रातील विविध भागांत युवा क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य, गर्दी व वाहतूक नियंत्रण, आरोग्यविषयक उपक्रम, पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान, गणेश मंडळांना भेटी तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.
या संपूर्ण उपक्रमांना संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रवींद्र सूर्यवंशी, राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री. शिवाजीराव शेलार, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. राजेश्वर हेंद्रे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती जयश्रीताई अहिरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह.भ.प. अवचितानंद मधुकर महाराज अहिरे तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ. स्मिताताई बांद्रेकर यांच्यासह राष्ट्रीय व राज्यस्तरीय वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.
गणेशोत्सवाच्या काळात ‘महिला तक्रार समिती’ची स्थापना
गणेशोत्सवाच्या कालावधीत युवा क्रांती फाउंडेशनच्या कार्यात एक महत्त्वपूर्ण संघटनात्मक पाऊल उचलण्यात आले. महिलांच्या विविध समस्या, अडचणी व तक्रारी ऐकून घेऊन त्यावर योग्य मार्गदर्शन आणि निवारणासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने ‘युवा क्रांती महिला तक्रार समिती’ स्थापन करण्यात आली.
ही समिती संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रवींद्र सूर्यवंशी, राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री. शिवाजीराव शेलार, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. राजेश्वर हेंद्रे आणि राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती जयश्रीताई अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आली.
महिलांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची माहिती घेणे, संबंधित प्रकरणातील दोन्ही बाजू समजून घेणे, आवश्यक संवाद साधणे तसेच योग्य मार्गदर्शन व निवारणासाठी प्रयत्न करणे, हा समितीचा प्रमुख उद्देश आहे.
महिला तक्रार समितीची रचना
अध्यक्ष : श्रीमती जयश्रीताई अहिरे — राष्ट्रीय महिला अध्यक्षा
उपाध्यक्षा : सौ. स्मिताताई बांद्रेकर — महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा तथा मुंबई अध्यक्षा महिला
सदस्य :
- श्रीमती वर्षाताई नाईक — राष्ट्रीय सहसंपर्क प्रमुख
- सौ. जसविंदरसिंग राणा — मुंबई उपाध्यक्षा तथा ठाणे जिल्हा प्रभारी
- सौ. शोभाताई पाटील — महाराष्ट्र प्रदेश महिला संघटक
- सौ. मीनाताई गवारे — पश्चिम महाराष्ट्र महिला कार्याध्यक्ष
- मा. मनीषा भांदककर — विदर्भ महिला अध्यक्षा
- सौ. वनमाला चंदनशिवे — वर्धा जिल्हा महिला सचिव
- सौ. मोहिनी खैरनार — नाशिक शहर युवती अध्यक्षा
महिलांना आपल्या समस्या मांडण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि तक्रारींकडे संवेदनशीलतेने पाहून योग्य मार्गदर्शन व निवारणासाठी प्रयत्न करणे, या उद्देशाने समितीची स्थापना करण्यात आली आहे.
कोपरगावमध्ये पोलिसांच्या कार्याचा गौरव
कोपरगाव येथे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष तथा अहिल्यानगर प्रभारी सय्यद भाई आणि कोपरगाव तालुका उपाध्यक्ष सलीम भाई यांनी गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांच्या कार्याचा गौरव केला.
हरवलेल्या एका चिमुकल्याचा पोलिसांनी तत्परतेने शोध घेऊन त्याला सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. या कार्याची दखल घेत सलीम भाई यांनी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
गणपती विसर्जनाच्या वेळी वाढणारी गर्दी आणि वाहतूक व्यवस्था लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांसोबत प्रत्यक्ष बंदोबस्तात सहभागी होत सहकार्य करण्यात आले.
पुण्यात आरतीसोबत विसर्जन मिरवणुकीत वाहतूक व्यवस्थेला सहकार्य
पुणे येथे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. अनिल जी. रेळेकर यांच्या वतीने युवा क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांना औरा हॉस्पिटल येथे गणपती बाप्पांच्या आरतीचा मान देण्यात आला. यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. राजेंद्रजी पन्हाळे यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य केले.
नागरिकांची गैरसोय टाळणे, वाहतुकीचा खोळंबा कमी करणे आणि मिरवणूक सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांसोबत समन्वय साधण्याचे काम त्यांनी केले.
मुंबईत आरोग्य, वाहतूक आणि सामाजिक उपक्रम
मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ. स्मिताताई बांद्रेकर यांनी आपल्या घरी गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर युवा क्रांतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आमंत्रित करून आरतीचा मान दिला. त्यानंतर विविध गणेश मंडळांना भेटी देऊन गणेशोत्सवात सहभाग नोंदवण्यात आला.
मुंबई अध्यक्ष श्री. धनेश रामरख्यानी यांनी गणेशोत्सवाच्या काळात विविध पोलीस ठाण्यांना भेटी देत डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधक औषध फवारणीचा सामाजिक उपक्रम राबवला. तसेच गोकुळाष्टमी, गणेश चतुर्थी आणि गणपती बाप्पांच्या आगमनाच्या काळात मुंबई पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांना मेडिकिटचे वाटप करून आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली.
श्री. कुणाल त्रिवेदी यांनी आरती संग्रहाचे पुस्तक घराघरांत पोहोचविण्याचा उपक्रम राबवला.
मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत जसविंदरसिंग राणा यांचे सहकार्य
मुंबई उपाध्यक्षा तथा ठाणे जिल्हा प्रभारी सौ. जसविंदरसिंग राणा यांनी गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक नियंत्रणासाठी सक्रिय सहभाग घेतला.
गणपती आगमन व विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना त्यांनी युवा क्रांतीच्या टीमसोबत प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य केले.
नागरिकांना अडचण निर्माण होऊ नये, वाहतुकीचा खोळंबा कमी व्हावा आणि मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रम सुरळीत पार पडावेत, यासाठी त्या युवा क्रांतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत बंदोबस्तासाठी सज्ज राहिल्या.
राकेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई टीमचे नियोजन
राष्ट्रीय महासचिव श्री. राकेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई टीमने गणेशोत्सवाच्या काळात विविध उपक्रमांचे नियोजन केले.
बैठका घेणे, पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधणे, कार्यक्रमांचे नियोजन करणे आणि विविध जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक कार्यासोबतच आवश्यक त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे काम मुंबई टीमने केले.
जळगावमध्ये रंजना ताईंच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक
गणेशोत्सवाच्या काळात जळगाव जिल्ह्यातील रंजना ताई यांनी रात्री ९ वाजेपर्यंत कर्तव्य बजावत सक्रिय सहभाग नोंदवला. महिलांनीही सार्वजनिक सेवा, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीच्या कार्यात पुढाकार घेऊ शकतो, याचे उदाहरण त्यांच्या कार्यातून दिसून आले.
रात्रपाळीतही जबाबदारीने कार्यरत राहून त्यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव आणि सेवाभाव कायम ठेवला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत युवा क्रांती फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण युवा क्रांती परिवारातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रंजना ताईंचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
गणेशोत्सवाच्या काळात महिलांचा वाढता सहभाग आणि जबाबदारीने केलेले कार्य संघटनेच्या सामाजिक उपक्रमांना अधिक बळ देणारे ठरले.
शिरपूरमध्ये पदाधिकारी-कार्यकर्त्यांची एकजूट
शिरपूर तालुक्यातील युवा क्रांतीचे पदाधिकारी गणेशोत्सव, धार्मिक कार्यक्रम आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये एकजुटीने सहभागी झाले.
धार्मिक कार्यक्रम, कथा किंवा सार्वजनिक उत्सव असो, नागरिकांची सुरक्षितता आणि कार्यक्रमाचे योग्य नियोजन यासाठी पदाधिकारी सज्ज राहिले. आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी सहकार्य करत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
धुळ्यात शोभाताई पाटील यांचा सक्रिय सहभाग
धुळे येथे सौ. शोभाताई पाटील यांनी गणेशोत्सवाच्या काळात विविध पोलीस ठाण्यांना भेटी देऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. तसेच अनेक ठिकाणी गणपती बाप्पांच्या आरतीचा मान मिळवत धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.
गणपती बाप्पांच्या महत्त्वावर वसुधामाई नाईक यांचा वैचारिक लेख
गणेशोत्सवाच्या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांसोबतच राष्ट्रीय ज्येष्ठ सल्लागार सौ. वसुधामाई नाईक यांनी गणपती बाप्पांच्या महत्त्वावर सुंदर आणि प्रेरणादायी लेख लिहून तो युवा क्रांती समूहात मांडला.
गणपती बाप्पांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित करताना भक्तीबरोबरच संस्कार, एकोपा, सेवाभाव आणि सामाजिक जबाबदारी यांचा संदेश या लेखातून मांडण्यात आला.
त्यांच्या या वैचारिक लेखामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने युवा क्रांती समूहात सकारात्मक विचारांची देवाणघेवाण झाली. धार्मिक उत्सवाला सामाजिक कार्यासोबत वैचारिक आणि जनजागृतीपर उपक्रमांची जोड देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
‘सेवा, सुरक्षा आणि सामाजिक बांधिलकी’चा संदेश
गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सव न राहता सेवा, सुरक्षा, सामाजिक एकोपा आणि नागरिकांच्या मदतीचा उत्सव व्हावा, या भावनेतून युवा क्रांती फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागांत आपापली जबाबदारी पार पाडली.
कोपरगावपासून पुणे, मुंबई, जळगाव, शिरपूर, धुळे, नाशिक आणि महाराष्ट्रातील विविध भागांत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी, आरोग्यविषयक उपक्रमांसाठी तसेच सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेतला.
महिलांच्या समस्या व तक्रारींसाठी स्वतंत्र महिला तक्रार समितीची स्थापना, वसुधामाई नाईक यांचा वैचारिक लेख, रंजना ताईंच्या कर्तव्यनिष्ठेचा गौरव, तसेच विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग यामुळे गणेशोत्सवाच्या उपक्रमांना व्यापक सामाजिक स्वरूप प्राप्त झाले.
गणेशोत्सवाच्या या कालावधीत विविध ठिकाणी झालेल्या उपक्रमांतून एकजूट, सेवाभाव, शिस्त, वैचारिक जागृती, महिला सहभाग आणि सामाजिक जबाबदारी यांचे दर्शन घडले.
“सेवा, सुरक्षा आणि सामाजिक बांधिलकी” या भावनेतून समाजहितासाठी कार्यरत राहण्याचा संदेश देत युवा क्रांती फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची जपणूक केली.

सर्व समावेशक news आहे. 14 तारखेपासून 25 तारीख आत्ता पर्यंत कार्याचा आढावा आहे.
खरेच सोपे नाही हे… पण अमर, पूजा आपण दोघांनीही करून दाखवले. शाबासकी देते. कौतुक करते…. 🍫🍫🙏🙏🌹🌹