‘
साहित्यिक आपल्या भेटीला’ उपक्रमातून चिमुकल्यांना कवितांची, कलेची आणि ज्ञानाची अनोखी मेजवानी.

आरळे, ता. जि. सातारा : शाळेची घंटा वाजली… पण नेहमीचा वर्ग नाही, नेहमीचा तास नाही! कुठे कविता, कुठे बालगीते, कुठे चित्रपट, तर कुठे प्रश्नमंजुषेची रंगत… विद्यार्थ्यांच्या टाळ्यांचा कडकडाट आणि चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद! अशा उत्साहपूर्ण वातावरणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आरळे येथे ‘आनंददायी शनिवार’ अक्षरशः महाआनंददायी शनिवार ठरला.युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. रवींद्र सूर्यवंशी, राष्ट्रीय युवा अध्यक्ष मा. शिवाजीराव शेलार आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. डॉ. राजेश्वर हेंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, वसुधा फाऊंडेशन, पुणे यांच्या वतीने ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसुधा फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या राष्ट्रीय ज्येष्ठ सल्लागार सौ. वसुधा वैभव नाईक होत्या.कार्यक्रमाला पाठ्यपुस्तकातील कवी श्री. राम घडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच राजयुवा प्रकाशनचे अध्यक्ष गौरव पुंडे, काव्ययोग काव्यसंस्थेचे अध्यक्ष योगेश हरणे आणि युवा कवयित्री सायली ढेबे यांची विशेष उपस्थिती लाभली.‘माझं कवितांचं गाव’, जकातवाडीचे अध्यक्ष प्रल्हाद पारटे सर व उपाध्यक्ष श्री. विश्वास नेरकर सर यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले.

रमाची पाटी’ने खिळवून ठेवले विद्यार्थीकार्यक्रमात विद्यार्थ्यांना ‘रमाची पाटी’ हा चित्रपट दाखविण्यात आला. चित्रपटानंतर साहित्य व चित्रपटावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होण्यासोबतच विचार करण्याची आणि आत्मविश्वासाने व्यक्त होण्याची संधी मिळाली.🎤 चिमुकल्यांच्या कवितांनी जिंकली उपस्थितांची मनेविद्यार्थ्यांनी आणि उपस्थित साहित्यिकांनी बालगीते व कविता सादर केल्या. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणाला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली. साहित्यिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कुतूहल दिसून आले.🎁 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपसौ. वसुधा वैभव नाईक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही, खोडरबर, शार्पनर आणि पेन्सिल यांचे वाटप करण्यात आले. तसेच पालकांना पुस्तके भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.📚 ‘माझं कवितेचं गाव’ जकातवाडीला पुस्तकांची अनमोल भेटकार्यक्रमानंतर साहित्यिक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी ‘माझं कवितेचं गाव’, जकातवाडी येथे भेट दिली. या भेटीदरम्यान सर्वांच्या वतीने जवळपास ५० पुस्तके ‘माझं कवितेचं गाव’ जकातवाडी येथील वाचनालयास भेट देण्यात आली. या पुस्तकांच्या भेटीमुळे वाचन संस्कृतीला चालना मिळण्यासोबतच साहित्यप्रेमाची सुंदर जपणूक करण्यात आली.याचवेळी ‘माझं कवितेचं गाव’, जकातवाडीचे अध्यक्ष प्रल्हाद पारटे सर आणि उपाध्यक्ष श्री. विश्वास नेरकर सर यांनी वसुधा फाऊंडेशनच्या वतीने उपस्थितांना तसेच वसुधा फाऊंडेशनला ‘कवितेचे गाव जकातवाडी’च्या वतीने विशेष पुस्तकभेट देऊन सन्मानित केले. या साहित्यिक देवाणघेवाणीमुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले.

📚 🎬 ‘🤝 शिक्षक, पालक आणि साहित्यिक एकत्रकार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका सौ. सुषमा दिलीप आलेकरी यांनी विशेष नियोजन व मार्गदर्शन केले. उपशिक्षिका सौ. रंजना चौरे मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. प्रियांका भोसले, समितीचे सदस्य आणि पालक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. या संपूर्ण उपक्रमामुळे साहित्यिक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ झाले.🌟 शनिवार ठरला अविस्मरणीय!शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकातील धडे नसून वाचन, विचार, कला, साहित्य, संस्कार आणि आनंद यांचा अनुभव आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, कवितांचा गोडवा, साहित्यिकांशी झालेला संवाद, पुस्तकांची देवाणघेवाण आणि वाचन संस्कृतीला मिळालेली चालना यामुळे आरळे शाळेतील हा शनिवार विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.‘वाचा… विचार करा… व्यक्त व्हा… आणि आनंदाने शिका!’ या संदेशाने भारलेला आरळे शाळेतील हा उपक्रम खऱ्या अर्थाने ‘महाआनंददायी शनिवार’ ठरला.विशेष उल्लेख :सौ. वसुधा वैभव नाईकअध्यक्षा – वसुधा फाऊंडेशनराष्ट्रीय ज्येष्ठ सल्लागार – युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना.
— प्रतिनिधी अमर पठारे सत्यवार्ता भारत लाइव्ह 24×7
9117151515

अप्रतिम बातमी झाली आहे. मनःपूर्वक धन्यवाद!!अमर…. 🌹