• Thu. Oct 15th, 2026

Satyavartabharat Live 24x7

India #1 News Platform लेटेस्ट व ब्रेकिंग न्यूज | हिन्दी समाचार | यूपी न्यूज

सईच्या जर्मनीतील नव्या भरारीस ‘युवा क्रांती’ परिवाराचा आशीर्वाद व शुभेच्छा.

ByMohini Khairnar/pathare

Sep 17, 2026
Spread the love

युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलिस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी साहेब व राष्ट्रीय युवती महिला अध्यक्षा मा जयश्री ताई अहिरे यांनी फोनद्वारे सईशी संवाद साधत तिच्या जर्मनीतील पुढील शिक्षण व नोकरीच्या नव्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सई च्या आई वडिलांचे विशेष कौतुक केले. सईने आपल्या कर्तृत्वाने आई-वडिलांचे, कुटुंबाचे तसेच समाजाचे नाव उज्ज्वल करावे, अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.

युवा क्रांती फाउंडेशनच्या राष्ट्रीय महिला मार्गदर्शक सौ. वैशालीताई चंद्रकांत बांगर व श्री. चंद्रकांत बांगर साहेब यांची कन्या सई पुढील शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने जर्मनी येथे जात असल्याने, तिच्या या नव्या प्रवासानिमित्त त्यांच्या निवासस्थानी युवा क्रांती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट देत सईचा विशेष सन्मान.

राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. डॉ. राजेश्वर हेंद्रे यांनी सईला शुभेच्छा देत परदेशातील नव्या वातावरणात ज्ञान, अनुभव आणि कर्तृत्वाच्या जोरावर यश संपादन करावे, असे मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय युवा अध्यक्ष मा शिवाजीराव शेलार यांनी सई ला शुभेच्छा देताना युवा पिढीने मोठी स्वप्न पाहून ती पूर्ण करण्यासाठी मेहनत व आत्मविश्वासाने पुढ जावे सईची जर्मनीतील वाटचाल यामागे तिच्या आई वडिलांच्या कष्टाची जोड आहे ही संधी सईच्या उज्वल भविष्याची नांदी असेल अशा सदिच्छा दिल्या.

राष्ट्रीय महिला कार्याध्यक्षा सौ. अमृताताई पठारे यांनी सईशी संवाद साधत तिच्या या नव्या प्रवासाबद्दल आनंद व्यक्त केला. संस्कार, आत्मविश्वास आणि मेहनतीची साथ कायम ठेवून आपल्या स्वप्नांना नवी उंची द्यावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

राष्ट्रीय महिला सल्लागार सौ. वसुधाताई नाईक यांनी सईला मनःपूर्वक शुभेच्छा देत जर्मनीतील शिक्षण व नोकरीचा अनुभव तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरो आणि तिच्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्षा हर्षलाताई मुलाणी यांनीही सईला शुभेच्छा देत तिच्या नव्या वाटचालीत आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश दिला.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष अमर पठारे तथा पश्चिम महाराष्ट्र मिडिया प्रमुख यांच्यासह युवा क्रांती फाउंडेशनचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या सदिच्छा भेटीस राष्ट्रीय महासचिव राकेश वाघ,राष्ट्रीय सल्लागार दिनेशजी मेहता,
राष्ट्रीय ज्येष्ठ महिला सल्लागार संगीताताई रोकडे, राष्ट्रीय संघटक सुरेश आप्पा गायकवाड, राष्ट्रीय महिला संपर्क प्रमुख वर्षाताई नाईक,
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह.भ.प अवचितनंद महाराज अहिरे, महिला प्रदेश अध्यक्षा स्मिताताई बांदेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल रेळेकर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षा मीनाताई गवारे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र पन्हाळे, पश्चिम महाराष्ट्र युवा उपाध्यक्ष राजू चौधरी, पश्चिम महाराष्ट्र मार्गदर्शक अंकुश आगरकर, पश्चिम महाराष्ट्र युवा सचिव अमित तांबे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख संदीप भाकरे, पश्चिम महाराष्ट्र संघटक सुदाम रणदिवे,पुणे जिल्हा महिला अध्यक्षा प्रतिभा महालकर, पुणे जिल्हा युवा अध्यक्ष किशोर गायकवाड, शहर अध्यक्ष गिरीष श्रीखंडे, महिला शहर अध्यक्षा पल्लवी जाधव तसेच नाशिक युवती अध्यक्षा मोहिनी खैरनार, हवेली तालुका संघटक भाग्यश्री बुबने यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सईला मनःपूर्वक शुभेच्छा देत उत्स्फूर्तपणे “जय युवा क्रांती!” असा जयघोष केला. या उत्साही वातावरणात सईच्या जर्मनीतील नव्या प्रवासाला शुभेच्छांचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करण्यात आला.

सईच्या जर्मनीतील पुढील शिक्षण, नोकरी आणि करिअरची वाटचाल यशस्वी होवो, तिची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत आणि तिच्या कर्तृत्वाने आई-वडिलांसह संपूर्ण युवा क्रांती परिवाराचे नाव उज्ज्वल होवो, यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांनी मनःपूर्वक सदिच्छा व्यक्त केल्या.

राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. डॉ. राजेश्वर हेंद्रे
राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री. शिवाजीराव शेलार यांच्या हस्ते सई यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे महिला टीमच्या पदाधिकाऱ्यांनी सई यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *