*“नऊ दिवसांची दुर्गा नव्हे, तर दहा दिशा व्यापणारी नारी!” स्वाभिमान, आत्मविश्वास आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचा प्रभावी संदेश; युवा क्रांती फाउंडेशनच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री-सन्मानाच्या विचारांना बळ

पुणे | प्रतिनिधी : अमर पठारे

पुणे : स्त्री म्हणजे केवळ सहनशीलतेचे प्रतीक नाही, तर संकटांशी दोन हात करणारी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी आणि स्वकर्तृत्वाने स्वतःचे स्थान निर्माण करणारी दुर्गाशक्ती आहे, असा ठाम संदेश कवयित्री वसुधा वैभव नाईक, पुणे यांच्या ‘माझ्यातील दुर्गा’ या कवितेतून व्यक्त झाला आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्त्रीशक्ती, स्वाभिमान, आत्मविश्वास आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार मांडणारा हा काव्याविष्कार लक्षवेधी ठरत आहे.नवरात्रात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते; मात्र प्रत्येक स्त्रीच्या मनातील सामर्थ्य ओळखून तिच्या सन्मानासाठी उभे राहणे, तिच्या स्वप्नांना बळ देणे आणि तिला समान संधी उपलब्ध करून देणे, हाच स्त्रीशक्तीच्या जागराचा खरा अर्थ असल्याचे या कवितेतून अधोरेखित होते.संकटे कितीही आली, तरी दुर्गा डगमगणार नाही!“माझ्या मनातील दुर्गा मला रोज नवी, नवी उमेद देते, संकटे खूप आली तरीही डगमगायचे नाही हे शिकवते…”या ओळींतून जीवनातील संघर्षांना धैर्याने सामोरे जाणाऱ्या स्त्रीची जिद्द व्यक्त होते. अडचणी, अपमान आणि प्रतिकूल परिस्थिती यांच्यापुढे हार न मानता पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा ही कविता देते. स्त्रीच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेणाऱ्या प्रवृत्तींना विरोध करणे आणि स्वतःचा स्वाभिमान जपणे आवश्यक असल्याचा ठाम विचारही यातून समोर येतो.लेखणीची धार, विचारांत क्रांती!स्त्रीच्या लेखणीत समाजाला जागृत करण्याची ताकद असते. तिच्या विचारांत परिवर्तनाची दिशा आणि कर्तृत्वात नव्या पिढीला प्रेरणा देण्याचे सामर्थ्य असते. अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची जिद्द व्यक्त करताना कवयित्रीने स्त्रीच्या संघर्षशील व्यक्तिमत्त्वाचे प्रभावी चित्रण केले आहे.आईची माया, बहिणीची साथ, मैत्रिणीचा विश्वास आणि सत्याची कास धरण्याची वृत्ती या विविध भूमिकांमधून स्त्रीचे भावविश्व उलगडते. स्वतःच्या अश्रूंना समजून घेत पुन्हा नव्या जिद्दीने उभे राहणे, हीच तिच्या अंतर्मनातील दुर्गाशक्ती असल्याचा भाव कवितेतून प्रकट होतो.दयेची भीक नको; कर्तृत्वाचा सन्मान हवा!“कुणाच्या दयेवर नाही जगत, माझ्या अस्तित्वाचा मला अभिमान; माझ्या कर्तृत्वातूनच दाखवून देईन, समाजात मिळवेन मानाचे स्थान…”या शब्दांतून स्त्रीच्या स्वावलंबनाचा आणि आत्मसन्मानाचा बुलंद आवाज ऐकायला मिळतो. महिलांना शिक्षण, सुरक्षितता, समान संधी आणि स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. त्यांच्या गुणवत्तेचा सन्मान झाला पाहिजे आणि त्यांच्या प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे, हा या कवितेचा व्यापक संदेश आहे.स्त्रीचा सन्मान हा केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता तो प्रत्येकाच्या विचारांत आणि कृतीत दिसला पाहिजे, ही भूमिका या काव्याविष्कारातून ठळकपणे मांडण्यात आली आहे.युवा क्रांती फाउंडेशनच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री-सन्मानाचा संदेशयुवा क्रांती फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. रविंद्र सूर्यवंशी, राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री. शिवाजीराव शेलार, राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती जयश्रीताई अहिरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. राजेश्वर हेंद्रे, संचालक तथा महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख श्री. भाऊसाहेब शेळके दादा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह.भ.प. अवचितानंद मधुकर अहिरे महाराज आणि महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ. स्मिताताई बांद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीशक्ती, महिला सन्मान आणि सामाजिक जनजागृतीच्या विचारांना समाजापर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांना महत्त्व प्राप्त होत आहे.
याच विचारधारेला सुसंगत असा संदेश वसुधा वैभव नाईक यांच्या ‘माझ्यातील दुर्गा’ या कवितेतून व्यक्त होतो. महिलांनी स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव ठेवावी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा आणि आत्मविश्वासाने जीवन जगावे, अशी प्रेरणा या कवितेतून मिळते.‘माझ्यातील दुर्गा’ म्हणजे आत्मविश्वासाचा श्वास!“माझ्यातील दुर्गा म्हणजे काय? माझ्यातील आत्मविश्वासाचा आहे श्वास…”कवितेतील हा भाव तिच्या संपूर्ण आशयाचा गाभा आहे. स्वतःवर विश्वास ठेवणे, संकटांवर मात करणे, स्वतःच्या अस्तित्वाचा अभिमान बाळगणे आणि इतर महिलांसाठीही प्रेरणेचा स्रोत बनणे, हेच अंतर्मनातील दुर्गाशक्तीचे खरे स्वरूप आहे.नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने स्त्रीशक्तीचा जागर घडवणारी ही कविता केवळ भावनांना स्पर्श करत नाही, तर समाजाला स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचे आवाहनही करते. महिलांच्या हक्कांचा आदर, त्यांच्या कर्तृत्वाची दखल आणि समानतेची भावना यांतूनच सशक्त समाजाची निर्मिती होऊ शकते.“देवीची पूजा करा, पण प्रत्येक स्त्रीचा सन्मानही करा; नारीशक्तीला वंदन करा, पण तिच्या हक्कांसाठीही ठामपणे उभे राहा!” हाच ‘माझ्यातील दुर्गा’ या कवितेतून उमटणारा परिवर्तनाचा बुलंद संदेश आहे.—
वसुधा वैभव नाईक, पुणेकवयित्री
सत्यवार्ता भारत लाइव्ह 24×7
