• Thu. Oct 15th, 2026

Satyavartabharat Live 24x7

India #1 News Platform लेटेस्ट व ब्रेकिंग न्यूज | हिन्दी समाचार | यूपी न्यूज

भिमाशंकर कारखाना भजन स्पर्धेत ‘स्वर साधना’ भजन मंडळाचे यश

Spread the love

प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले; प्रदीपदादा वळसे पाटील यांच्या हस्ते सन्मान

प्रतिनिधी : सुरेश आप्पा गायकवाड

माळवाडी–टाकळी हाजी : भिमाशंकर कारखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य भजन स्पर्धेत माळवाडी–टाकळी हाजी येथील ‘स्वर साधना भजन मंडळा’ने उत्कृष्ट भजन सादरीकरण करत उल्लेखनीय यश संपादन केले. मंडळाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले असून, पारितोषिक वितरण समारंभात प्रदीपदादा वळसे पाटील यांच्या हस्ते मंडळाचा सन्मान करण्यात आला.

भिमाशंकर कारखाना येथे १५ व १६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य भजन स्पर्धेला भजनी मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत तब्बल ११४ भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेत ‘स्वर साधना भजन मंडळ, माळवाडी–टाकळी हाजी’ यांनी प्रथम क्रमांकाच्या गटात १० वा क्रमांक मिळवत आपली उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. मंडळाच्या प्रभावी आणि सुरेल भजन सादरीकरणामुळे भजनप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

मंडळाचे नेतृत्व अध्यक्ष ह.भ.प. संदीप भाकरे महाराज यांनी समर्थपणे केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळातील सर्व कलाकारांनी एकजुटीने आणि उत्कृष्ट सांघिक समन्वयातून स्पर्धेत सहभाग घेतला.

  • संदीप भाकरे – हार्मोनियम वादक
  • प्रसाद भाकरे – मृदंगमणी
  • लहु भाकरे – कोरस
  • सुरेश भाकरे – कोरस
  • सुनिता भाकरे – गायिका
  • संजय येवले – तबला वादक
  • उत्तम नाणेकर – गायक
  • दत्तात्रय जाधव – गायक
  • जय आढाव – मृदंग वाद
  • विजय आढाव – टाळवादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *