• Thu. Oct 15th, 2026

Satyavartabharat Live 24x7

India #1 News Platform लेटेस्ट व ब्रेकिंग न्यूज | हिन्दी समाचार | यूपी न्यूज

गोविंदांच्या उत्साहाला युवा क्रांतीची साथ!

Spread the love

मलाड पूर्वमध्ये दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांना विशेष मदतीचा हातमुंबई प्रतिनिधी अमर पठारे | मलाड पूर्व | १ सप्टेंबर २०२६गोकुळ अष्टमीच्या उत्साहात संपूर्ण मुंबईत दहीहंडीचा जल्लोष सुरू असताना मलाड पूर्वमध्ये गोविंदा पथकांच्या उत्साहाला युवा क्रांती फाउंडेशनने विशेष साथ दिली. दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरा रचून वर चढणाऱ्या गोविंदांना प्रोत्साहन देत त्यांना विशेष मदत करण्यात आली.युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटनेच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. उत्सवाचा आनंद साजरा करतानाच गोविंदांच्या मेहनतीची आणि धाडसाची दखल घेत त्यांना मदतीचा हात देण्यात आला.हा उपक्रम युवा क्रांती फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय महासचिव श्री. राकेश जी वाघ यांच्या मार्गदर्शनाने पार पडला.या उपक्रमात मालाड पूर्व महिला तालुका अध्यक्षा सुचित्रा रेडियर मॅडम, मालाड पूर्व तालुका युवती उपाध्यक्षा तनिष्का रेडियर मॅडम, उत्तर मुंबई जिल्हा युवा उपाध्यक्ष श्री. रोहित गुप्ता आणि मालाड पूर्व सदस्य श्री. कमलेश यादव यांची उपस्थिती होती.या उपक्रमासाठी डॉ. योगेश लखानी, ब्राईट मीडिया लिमिटेडचे ओनर, यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या माध्यमातून मुंबई अध्यक्ष श्री. धनेश रामरखनी यांच्याशी संपर्क साधण्यात आला.विशेष म्हणजे, गोविंदा पथकांच्या मदतीसाठी मुंबई अध्यक्ष श्री. धनेश रामरखनी यांनी विशेष स्वरूपात तयार केलेल्या मेडिकल किटबाबत व्हिडिओच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र मीडिया प्रमुख अमर पठारे यांना माहिती दिली.दहीहंडी हा केवळ उत्सव नसून एकजूट, धाडस, मेहनत आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा उत्सव आहे. याच भावनेतून गोविंदांच्या उत्साहाला प्रोत्साहन देत युवा क्रांती फाउंडेशनच्या टीमने सामाजिक कार्याची वेगळी छाप उमटवली.गोविंदांचा उत्साह वाढवण्यासाठी मदतीचा हात — युवा क्रांती फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *