• Thu. Oct 15th, 2026

Satyavartabharat Live 24x7

India #1 News Platform लेटेस्ट व ब्रेकिंग न्यूज | हिन्दी समाचार | यूपी न्यूज

मुंबई दौऱ्यावर युवती राष्ट्रीय अध्यक्षा जयश्रीताई अहिरे; मुंबई टीमची घेतली धावती भेट

Spread the love

मुंबई 10सप्टेंबर 2026: युवा क्रांती फाउंडेशनच्या युवती राष्ट्रीय अध्यक्षा जयश्रीताई अहिरे या मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी मुंबई टीमची धावती भेट घेतली. यावेळी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

दरम्यान, आज सकाळी ९ वाजता मीरा-भाईंदर तालुका महिला उपाध्यक्षा राधाताई शेट्टी यांच्या मीरा-भाईंदर येथील कार्यालयात नवनिर्वाचित महिला पदाधिकारी व सदस्यांना ओळखपत्रांचे (ID Card) वाटप करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा तथा मुंबई महिला अध्यक्षा सौ. स्मिता बांदेकर यांच्या हस्ते हे ओळखपत्र वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास उत्तर मुंबई जिल्हा महिला सल्लागार अमीनाताई खान, मीरा-भाईंदर तालुका महिला उपाध्यक्षा राधाताई शेट्टी, सदस्य नैना बेन वाढेर, मनीषाताई टॅगर, मीरा-भाईंदर तालुका महिला संपर्कप्रमुख हीना शिधपुरा, मीरा-भाईंदर महिला सहकार्याध्यक्षा ज्योती हरिया तसेच इतर महिला पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष अमर शिवाजी पठारे तसेच नाशिक शहर अध्यक्षा मोहिनी खैरनार/पठारे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान नवनियुक्त सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने व सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास उपस्थित राहून स्वागत केल्याबद्दल तसेच सकाळच्या वेळेत उपस्थित राहून सहकार्य केल्याबद्दल सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
सदैव आपल्या सोबत असे बोलत
युवा क्रांती पोलीस मित्र फाउंडेशन
महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा / मुंबई महिला अध्यक्षा — सौ. स्मिता बांदेकर यांनी सर्व माहिती दिली.

— प्रतिनिधी अमर पठारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *