मुंबई | दि. २७ ऑगस्ट २०२६युवा क्रांती फाऊंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटनेच्या वतीने चारकोप पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.हा उपक्रम संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. डॉ. राजेश्वर हेंद्रे, राष्ट्रीय महासचिव श्री राकेश वाघ,राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती जयश्रीताई अहिरे आणि राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री. शिवाजीराव शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सौ. स्मिता ताई बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.यावेळी एसपीआय श्री. महेश बळवंतराव तसेच चारकोप पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुंबई महिला टीममधील अमिना खान, हीरा पायल, आशा केळकर आणि नयना वाढेर यांनी सहभाग घेतला.“हर घर क्रांती, जय युवा क्रांती!” 🚩जय हिंद! 🇮🇳 जय महाराष्ट्र!








