अहिल्यानगर ग्रामीण वाहतूक शाखेच्या टाटा सुमो वाहनाबाबत प्रश्न; अधिकृत कागदपत्रे तपासण्याची मागणी

अहिल्यानगर : वाहनांना HSRP नंबर प्लेट आहे की नाही, इन्शुरन्स, पीयूसी तसेच वाहनाची वैधता तपासून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या अहिल्यानगर ग्रामीण वाहतूक शाखेच्या पथकाच्या वाहनाबाबतच आता प्रश्न उपस्थित झाला आहे.८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साधारण १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान अहिल्यानगर–करमाळा महामार्गावरील घोगरगाव टोलनाका परिसरात ग्रामीण वाहतूक शाखेचे कर्मचारी वाहनांची तपासणी व वाहतुकीचे नियमन करीत होते. यावेळी त्यांच्या वापरातील टाटा सुमो वाहन क्रमांक MH-16-N-431 याकडे लक्ष वेधले गेले.सदर वाहनावर HSRP नंबर प्लेट दिसून आली नसल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच त्या वेळी वाहनाचे इन्शुरन्स, पासिंग, फिटनेस, पीयूसी तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची वैधता प्रत्यक्ष अधिकृत नोंदी तपासल्याशिवाय निश्चित करता आली नाही.त्यामुळे संबंधित सक्षम विभागाने सदर वाहनाची HSRP नंबर प्लेट, इन्शुरन्स, पीयूसी, फिटनेस, पासिंग आणि इतर आवश्यक कागदपत्रे नियमानुसार वैध आहेत की नाहीत, याची अधिकृत तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे, याच ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी HSRP नंबर प्लेट नसलेली वाहने, इन्शुरन्स नसलेली वाहने, पीयूसी नसलेली वाहने तसेच मुदत संपलेली कागदपत्रे असलेल्या वाहनांची तपासणी करीत होते. नियमभंग आढळल्यास संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते.मात्र, वाहनांची तपासणी करणाऱ्या यंत्रणेच्या वाहनाबाबतच अशी बाब निदर्शनास येत असेल, तर त्या वाहनाची वैधता कोण तपासणार? तसेच त्यामध्ये नियमभंग आढळल्यास नियमानुसार कोणती कारवाई केली जाणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.दरम्यान, सदर वाहनाची कागदपत्रे अधिकृत नोंदी तपासल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी MH-16-N-431 या वाहनाची संपूर्ण कागदपत्रांसह नियमानुसार तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.नियमांची अंमलबजावणी करताना नियम सर्वांसाठी समान असावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
— प्रतिनिधी : पोलीस मित्र संपर्क कार्यालय, सत्यवार्ता भारत — उपसंपादक तथा पुणे जिल्हा प्रतिनिधीह.भ.प. सुरेश आप्पा महाराज गायकवाड, मलठणजाहिरातीसाठी संपर्क : 9850639169
