कोपरगाव पोलिसांचा सत्कार; युवा क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांचेही कौतुक
कोपरगाव : प्रतिनिधी 23/0/2026
कोपरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून हरवलेल्या यश खैरनार या दहा वर्षीय बालकाचा पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप शोध लागला. पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत बालकाला शोधून त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या तत्पर कार्यवाहीबद्दल बालकाच्या पालकांसह नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

या उल्लेखनीय कार्याबद्दल युवा क्रांती फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी कोपरगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय डमाळे साहेब तसेच पीआय सोनवणे साहेब यांचा यथोचित सत्कार करून युवा क्रांती संघटनेतर्फे आभार मानले.
यावेळी युवा क्रांतीचे कोपरगाव तालुका युवा उपाध्यक्ष सलीम रफिक शेख आणि कोपरगाव तालुका सहसंघटक किशोर चंद्रभान मोरे यांनी या प्रकरणात मोलाची भूमिका बजावत आवश्यक सहकार्य केले.

यावेळी युवा क्रांतीचे कोपरगाव तालुका युवा उपाध्यक्ष सलीम रफिक शेख आणि कोपरगाव तालुका सहसंघटक किशोर चंद्रभान मोरे यांनी या प्रकरणात मोलाची भूमिका बजावत आवश्यक सहकार्य केले.पोलिसांकडून युवा क्रांतीच्या कार्याचे कौतुकया प्रसंगी कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये पीएसआय डमाळे साहेब यांनी सलीम शेख आणि किशोर मोरे यांचाही सत्कार केला. युवा क्रांती फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे पोलिसांनी भरभरून कौतुक केले. समाजहितासाठी संघटना करत असलेले कार्य कौतुकास्पद असून, “यापुढेही आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज भासल्यास आम्ही नक्कीच संपर्क साधू,” असे पोलिसांकडून सांगण्यात आले.तसेच, युवा क्रांती संघटना अतिशय चांगले सामाजिक कार्य करत असून, भविष्यातही असेच समाजोपयोगी कार्य सुरू ठेवावे, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली. कायदा हातात न घेता कायद्याच्या चौकटीत राहून समाजसेवा करणे आणि गरजू नागरिकांना मदत करणे हेच संघटनेचे प्रमुख ध्येय असावे, असा संदेशही यावेळी देण्यात आला.हरवलेल्या बालकाचा सुखरूप शोध घेऊन त्याला पालकांच्या स्वाधीन केल्याबद्दल बालकाच्या पालकांनी कोपरगाव पोलीस प्रशासन तसेच युवा क्रांती फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले. या कार्यात सलीम शेख आणि किशोर मोरे यांनी केलेल्या सहकार्याबद्दलही पालकांनी समाधान व्यक्त केले.पोलिसांची तत्परता, युवा क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य आणि पालकांचा विश्वास यामुळे बालक सुखरूप आपल्या कुटुंबीयांकडे परतल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.“कायदा हातात न घेता, कायद्याच्या चौकटीत राहून समाजसेवा करणे – हेच युवा क्रांतीचे ध्येय!”
प्रतिनिधी:अमर पठारे
9117151515
