
खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सन्मान!

पारनेर, दि. २२ सप्टेंबर २०२६ : प्रतिनिधी सुरेश आप्पा गायकवाडपारनेर तालुक्यातील सावरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्य सरचिटणीस बाळासाहेब शिरतार यांच्या दोन दशकांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. खासदार नीलेश लंके यांच्या हस्ते शिरतार यांचा हा सन्मान करण्यात आला.गेल्या वीस वर्षांपासून आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या बाळासाहेब शिरतार यांनी सामाजिक बांधिलकी जपत वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करत त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून राज्यस्तरावर कार्यरत असलेल्या शिरतार यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसह विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत यापूर्वीही विविध सामाजिक संस्थांकडून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. नुकताच लोककलावंत सांस्कृतिक विचार मंचच्या वतीने शिर्डी येथे त्यांना ‘साई जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता.पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मिळालेला ‘समाजभूषण पुरस्कार’ हा त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान मानला जात असून, या गौरवामुळे त्यांच्या सामाजिक कार्याला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शिरतार यांच्या सामाजिक योगदानाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून त्यांना पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर, उपसभापती संदीप सालके, माजी सभापती बाबासाहेब तरटे, शिवाजी बेलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते मोहनराव रोकडे, सुनील माकरे, शिवाजी जेडगुले, नवनाथ गांजे, भास्कर बोरुडे, सचिन टकले, अश्विनीताई बोरुडे, धोंडीभाऊ शिरतार, ईश्वर भोसले यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.चौकट | ‘पुरस्कारातून सामाजिक कार्याला नवी प्रेरणा’“गेल्या वीस वर्षांपासून आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी काम करण्याची संधी मिळत आहे. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, हीच माझी सामाजिक बांधिलकी आहे. पारनेर बाजार समितीच्या वतीने मिळालेला हा समाजभूषण पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. या सन्मानातून भविष्यात आणखी जोमाने सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”—
बाळासाहेब शिरतारसामाजिक कार्यकर्ते तथा राज्य सरचिटणीस, जय मल्हार क्रांती संघटना यांनी सर्व माहिती सत्यवार्ता भारत लाईव्ह 24×7 ह.भ.प. राष्ट्रीय उपसंपादक तथा पुणे जिल्हा प्रतिनिधीह.भ.प. सुरेश आप्पा महाराज गायकवाड यांना दिली.
