• Thu. Oct 15th, 2026

Satyavartabharat Live 24x7

India #1 News Platform लेटेस्ट व ब्रेकिंग न्यूज | हिन्दी समाचार | यूपी न्यूज

अहिल्यानगर मनपा आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सागर बोरुडे; सहअध्यक्षपदी दत्ता भाऊ गाडळकर

Spread the love

अहिल्यानगर प्रतिनिधी 13 सप्टेंबर 2026: अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सागर बोरुडे तसेच सहअध्यक्षपदी दत्ता भाऊ गाडळकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.महापौर ज्योती गाडे तसेच उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते डॉ. सागर बोरुडे व दत्ता भाऊ गाडळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक निखिल वारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.आरोग्य समितीच्या माध्यमातून महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच आरोग्यविषयक प्रश्नांना प्राधान्य देऊन प्रभावीपणे काम करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.नवनियुक्त अध्यक्ष व सहअध्यक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून अभिनंदन व पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *