ज्ञानेश्वरीला लाठीकाठीत रौप्यपदक; राजवर्धनने किक बॉक्सिंगमध्ये पटकावले सुवर्णपदक

वडगाव रासाई : बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सक्सेस इंग्लिश मीडियम स्कूलच्या शेलार भावंडांनी चमकदार कामगिरी करत दोन पदकांची कमाई केली. अवघ्या ७ वर्षांच्या ज्ञानेश्वरी किरण शेलार हिने लाठीकाठी स्पर्धेत रौप्यपदक, तर ९ वर्षांच्या राजवर्धन किरण शेलार याने किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत आपल्या कुटुंबासह शाळेचे आणि गावाचे नाव उंचावले.दोन्ही विद्यार्थ्यांना सक्सेस इंग्लिश मीडियम स्कूलच्या क्रीडा शिक्षिका पायल दोरगे मॅडम व रेणुका पवार मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत आत्मविश्वासाने सहभाग घेत आपल्या क्रीडा कौशल्याची प्रभावी छाप पाडली.ज्ञानेश्वरीची लाठीकाठीत चमकज्ञानेश्वरी किरण शेलार (वय ७ वर्षे) हिने लाठीकाठी या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक मिळवले. लहान वयात राज्यस्तरीय स्पर्धेत पदक मिळवण्याची तिची कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरली आहे.राजवर्धनचा किक बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पंच!राजवर्धन किरण शेलार (वय ९ वर्षे) याने किक बॉक्सिंगमध्ये दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या यशाबद्दल कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.शेलार कुटुंबाच्या शिरपेचात मानाचा तुराज्ञानेश्वरी आणि राजवर्धन हे वडगाव रासाई येथील प्रगतिशील बागायतदार व सामाजिक कार्यकर्ते माननीय पोपटदादा शेलार यांचे नातू आहेत. तसेच युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष शिवाजीराव शेलार यांचे पुतणे असून, युवा उद्योजक किरण शेलार व पोलीस मित्र संघटनेच्या पुणे जिल्हा युवती अध्यक्षा प्रियांका शेलार यांचे चिरंजीव व कन्या आहेत.माजी आमदारांसह मान्यवरांकडून कौतुकशिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक बापू पवार तसेच जिल्हा परिषद सभापती सुजाता भाभी पवार यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल क्रीडा भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच युवा क्रांती संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रवींद्रदादा सूर्यवंशी, राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्रीताई अहिरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेश्वर हेंद्रे, राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष अमृताताई पठारे, राष्ट्रीय महिला मार्गदर्शक वैशालीताई बांगर, राष्ट्रीय सल्लागार वसुधाताई नाईक, राष्ट्रीय संपर्कप्रमुख वर्षाताई नाईक, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हर्षलाताई मुलांनी, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षा मीनाताई गवारे, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष प्रतिभाताई महालकर यांनीही दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले.यावेळी अंकुशराव आगरकर, राजूदादा पन्हाळे, राजूदादा चौधरी, संदीपजी भाकरे, अशोकदादा पाचुंदकर, विलासराव रोहिले, अमित तांबे, किशोर गायकवाड तसेच हभप सुरेश आप्पा महाराज गायकवाड यांनीही ज्ञानेश्वरी आणि राजवर्धन यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल भविष्याची नांदीलहान वयात राज्यस्तरीय स्पर्धेत पदक मिळवणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. ज्ञानेश्वरीचे रौप्यपदक आणि राजवर्धनचे सुवर्णपदक हे त्यांच्या मेहनत, जिद्द, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण सरावाचे फलित असल्याचे मानले जात आहे.या दोन्ही गुणवंत खेळाडूंनी भविष्यात जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आणखी मोठे यश संपादन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, ज्ञानेश्वरी व राजवर्धन शेलार यांचे सर्व स्तरातून मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. राजवर्धन शेलार — सुवर्णपदक ज्ञानेश्वरी शेलार — रौप्यपदकदोन्ही युवा खेळाडूंना पुढील क्रीडा वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

राजवर्धन शेलार — सुवर्णपदक

ज्ञानेश्वरी शेलार — रौप्यपदक
