
मुंबई : प्रतिनिधी
युवा क्रांती फाउंडेशनच्या पोलीस मित्र उपक्रमांतर्गत संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी, राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री. शिवाजीराव शेलार, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. राजेश्वर हेंद्रे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती जयश्रीताई अहिरे, राष्ट्रीय महासचिव, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह.भ.प. अवचितानंद मधुकर महाराज अहिरे तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा तथा मुंबई अध्यक्षा सौ. स्मिताताई बांद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई अध्यक्ष धनेश रामराख्यानी यांनी पोलिसांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध सामाजिक उपक्रम राबविले.यावेळी त्यांनी वाकोला पोलीस ठाण्यास भेट देऊन API ठाले साहेब यांची भेट घेतली. यावेळी पोलिसांच्या उपयोगासाठी मेडिकल किट तसेच आरतीचे पुस्तक त्यांना देण्यात आले.त्यानंतर जुहू बीच (सांताक्रूझ पोलीस ठाणे) परिसराला भेट देऊन API जाधव साहेब यांची भेट घेण्यात आली. यावेळी गर्दी नियंत्रण, आपत्कालीन परिस्थितीतील उपाययोजना तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात सुरू असलेल्या व्यवस्थेची माहिती घेण्यात आली. गर्दीमध्ये आवश्यक सूचना देणे व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही मेडिकल किट देण्यात आले.यावेळी API जाधव साहेबांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना, गर्दी व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीतील पोलिसांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून युवा क्रांती पोलीस मित्रांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.या सामाजिक उपक्रमात युवा क्रांती फाउंडेशन पोलीस मित्र – सुचित्रा रेड्डियार, तनिष्का रेड्डियार आणि कमलेश यादव हे उपस्थित होते.पोलिसांच्या कार्याला सहकार्य करत त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उपस्थितांनी सांगितले.



API ठाले साहेब यांचे मनोगत
“युवा क्रांती फाउंडेशनच्या पोलीस मित्र उपक्रमांतर्गत पोलिसांच्या आरोग्याची आणि दैनंदिन कामकाजाची काळजी घेत मेडिकल किट तसेच आरतीचे पुस्तक देण्यात आले, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. पोलीस दल हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव कार्यरत असते. अशा सामाजिक उपक्रमांमधून पोलिसांना मिळणारे सहकार्य आणि आपुलकी निश्चितच प्रेरणादायी आहे. युवा क्रांती फाउंडेशनने भविष्यातही समाजहिताचे आणि पोलीस दलाला सहकार्य करणारे उपक्रम सातत्याने राबवावेत.”
API जाधव साहेब यांचे मनोगत
“जुहू बीच परिसरात मोठ्या संख्येने नागरिक व पर्यटक येत असतात. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन, नागरिकांची सुरक्षितता आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य पद्धतीने काम करणे अत्यंत महत्त्वाचे असते. युवा क्रांती फाउंडेशनच्या पोलीस मित्रांनी प्रत्यक्ष भेट देऊन पोलिसांच्या कार्याची माहिती घेतली आणि मेडिकल किट देऊन सहकार्य केले, ही चांगली सामाजिक भावना आहे. नागरिकांनीही पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे. सुरक्षितता ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून नागरिकांच्या सहकार्यानेच ती अधिक प्रभावीपणे साध्य होऊ शकते. युवा क्रांती फाउंडेशनच्या पोलीस मित्रांचे या उपक्रमासाठी अभिनंदन.”
