पोलीस बांधवांच्या आरोग्य सुरक्षेसाठी युवा क्रांती पोलीस मित्रांचा सामाजिक उपक्रम
मुंबई : प्रतिनिधी अमर पठारे
22 सप्टेंबर 2026
मुंबई शहरात डेंग्यू व मलेरियाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी युवा क्रांती पोलीस मित्र यांच्या वतीने दिंडोशी पोलीस स्टेशन, मालाड पूर्व येथे डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधक फवारणी करण्यात आली.युवा क्रांती फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी, राष्ट्रीय महासचिव श्री. राकेश वाघ तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा तथा मुंबई महिला अध्यक्षा सौ. स्मिताताई बांद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.युवा क्रांती पोलीस मित्र मुंबई अध्यक्ष धनेश रामरखियानी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात रविंद्र पांडिया, मालाड सदस्य आणि उमाशंकर गुप्ता, मालाड सदस्य यांनी स्वतः उपस्थित राहून दिंडोशी पोलीस स्टेशन परिसरात डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधक फवारणी केली.पोलीस अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने युवा क्रांती पोलीस मित्रांनी हा उपक्रम राबविला. या उपक्रमाबद्दल उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संघटनेचे कौतुक करून आभार व्यक्त केले.युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची संपूर्ण माहिती पश्चिम महाराष्ट्र मीडिया प्रमुख अमर पठारे यांना देण्यात आली.
या सामाजिक उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर युवा क्रांती फाउंडेशनमधील सर्व पदाधिकारी व सदस्यांनीही या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. पोलीस बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मुंबई अध्यक्ष धनेश रामरखियानी तसेच रविंद्र पांडिया आणि उमाशंकर गुप्ता यांचे विशेष अभिनंदन केले.
