• Thu. Oct 15th, 2026

Satyavartabharat Live 24x7

India #1 News Platform लेटेस्ट व ब्रेकिंग न्यूज | हिन्दी समाचार | यूपी न्यूज

दिंडोशी पोलीस ठाण्यात युवा क्रांती फाउंडेशनतर्फे रक्षाबंधन उत्साहात

Spread the love

मुंबई, मलाड पूर्व | दि. २८ ऑगस्ट २०२६

युवा क्रांती फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटनेच्या वतीने मलाड पूर्व येथील दिंडोशी पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती जयश्रीताई अहिरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. डॉ. राजेश्वर हेंद्रे, राष्ट्रीय महासचिव श्री राकेश वाघ,राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री. शिवाजीराव शेलार तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ. स्मिता बांदेकर ताई यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या कर्तव्याला आणि समाजासाठीच्या योगदानाला सन्मान देण्यात आला. यावेळी दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र शिंदे यांनी युवा क्रांती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरे केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमास सुचित्रा रेडियर, मालाड पूर्व महिला तालुका अध्यक्षा; तनिष्का रेडियर, मालाड पूर्व तालुका युवती उपाध्यक्षा; श्री. रोहित गुप्ता, उत्तर मुंबई जिल्हा युवा उपाध्यक्ष; तसेच श्री. कमलेश यादव, मालाड पूर्व सदस्य यांची उपस्थिती होती.

पोलिसांसाठी विशेष मेडिकल किटचे वाटप

या उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड देत डॉ. योगेश लखानी, ब्राईट मीडिया लिमिटेडचे ओनर, यांनी मुंबई अध्यक्ष श्री. धनेश रामरखनी यांच्याशी संपर्क साधून पोलिसांसाठी विशेष तयार करण्यात आलेल्या मेडिकल किट उपलब्ध करून दिल्या.

पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्यासाठी विशेष मेडिकल किट देण्यात आल्याने या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

रक्षाबंधनाच्या माध्यमातून पोलीस आणि समाजातील नाते अधिक दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. पोलिसांच्या सेवेला सन्मान देत त्यांच्यासोबत सण साजरा करण्याचा हा उपक्रम सामाजिक एकतेचे उदाहरण ठरला.
श्री. धनेश रामरखनी
मुंबई अध्यक्ष यांनी सर्व सविस्तर माहिती दिली.

जय हिंद! 🇮🇳
जय महाराष्ट्र! 🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *