• Thu. Oct 15th, 2026

Satyavartabharat Live 24x7

India #1 News Platform लेटेस्ट व ब्रेकिंग न्यूज | हिन्दी समाचार | यूपी न्यूज

भोसरी फ्लायओव्हरवर भीषण अपघात; ट्रक-मोटरसायकल धडकेत दोन जण गंभीर जखमी, ट्रकचालक फरार

आंदोलन व उपोषणाचा इशारा; कारवाई न झाल्यास 24 ऑगस्टला आंदोलन
Spread the love

भोसरी : भोसरी फ्लायओव्हरवर ट्रक आणि मोटरसायकलमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात मोटरसायकलवरील दोन जण गंभीर जखमी झाले असून अपघातानंतर ट्रकचालक ट्रकसह फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक आणि मोटरसायकलची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. धडकेत मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दोन्ही जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून फरार ट्रकचालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.या अपघातामुळे भोसरी फ्लायओव्हर परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

कॅमेरा मॅन वैभव चौहान सहप्रतिनिधी : यश कोलते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *