बारा दिवस विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल; दररोज महाआरती व अन्नदान

बेल्हे : प्रतिनिधी ह.भ.प. सुरेश आप्पा महाराज गायकवाड
कुरुंद मळा, बेल्हे येथे श्री गणेश मित्र मंडळाची स्थापना १९९२ मध्ये करण्यात आली असून, यंदाचा गणेशोत्सव गेल्या बारा दिवसांपासून मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि आनंदात साजरा करण्यात आला.मंडळाच्या वतीने दररोज रात्री ठीक ८ वाजता महाआरती घेण्यात येत असून, त्यानंतर भाविकांसाठी अन्नदान व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. मंडळाचे कार्यकर्ते व सर्व सदस्य या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत.गणेशोत्सवानिमित्त संगीत खुर्ची, मटका पुडी, तळ्यात-मळ्यात, विविध वेशभूषा स्पर्धा, नाटक, संगीत व गायनाचे कार्यक्रम तसेच पारंपरिक गाण्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.लहान मुला-मुलींचाही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग राहिला. सहभागी बालकांचा गुणगौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. तसेच परिसरातील महिलांच्या सहभागातून हळदी-कुंकू कार्यक्रमासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.गणेशोत्सवाच्या विविध कार्यक्रमांना सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच बेल्हे पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी आणि अनेक मान्यवरांनी भेट देऊन सहभाग नोंदविला. मान्यवरांच्या हस्ते महाआरतीही करण्यात आली.श्री गणेश मित्र मंडळामध्ये सुमारे ३०० सदस्य असून, सर्व सदस्यांच्या सहकार्याने आणि एकजुटीने गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे सदस्य अक्षय बोराडे यांनी दिली.
सत्यवार्ता भारत लाइव्ह २४×७ह.भ.प. सुरेश आप्पा महाराज गायकवाडराष्ट्रीय उपसंपादक तथा प्रतिनिधी, पुणे जिल्हामो. ९८५०६३९१६९
