
मालेगाव : आज मालेगाव येथे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री मा. दादासाहेब भुसे यांची संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली.यावेळी सय्यद शेख, पोपट कुऱ्हाडे, एकनाथ जाधव, सलीम शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते. भेटीदरम्यान संघटनेच्या सामाजिक व जनहिताच्या कार्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती मंत्री दादासाहेब भुसे यांना देण्यात आली.संघटनेच्या कार्याचे कौतुक करत मंत्री दादासाहेब भुसे यांनी संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी तसेच संपूर्ण संघटनेला पुढील सामाजिक कार्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.या सदिच्छा भेटीमुळे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही समाजहितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
