अकलूद येथे जिल्हास्तरीय पदाधिकारी व सभासदांची बैठक संपन्न; सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्य
युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. रविंद्र सूर्यवंशी, राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री. शिवाजीराव शेलार, राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती जयश्रीताई अहिरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. राजेश्वर हेंद्रे, संचालक तथा महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख श्री. भाऊसाहेब शेळके दादा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह.भ.प. अवचितानंद मधुकर अहिरे महाराज आणि महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सौ. स्मिताताई बांद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्य सुरू आहे.

अकलूद, प्रतिनिधी : युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या वतीने संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. रविंद्र सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक बुधवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी अकलूद, ता. यावल, जि. जळगाव येथे आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा पदाधिकारी तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीमध्ये संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यासह जळगाव जिल्ह्यात भव्य जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी जळगाव जिल्ह्याचा भव्य मेळावा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष करताड सिंग राठोड, महाराष्ट्र प्रदेश सल्लागार अशोक कोंडीराम जोशी, जामनेर तालुका अध्यक्ष सचिन चव्हाण, जामनेर शहर अध्यक्ष ईश्वर चव्हाण, जामनेर महिला अध्यक्ष अंजूताई पवार, संतोष जोशी महाराज, अशोक देवराव जोशी, आकाश तेजसराव जोशी, अंकुश जोशी, शेख इम्रान रिजवान, संभाजी शिवाजी गंगावणे, जळगाव जिल्हाध्यक्ष अशोक तायडे, यावल तालुका अध्यक्ष सागर कोळी, लक्ष्मीबाई पांडुरंग मेढे, रुपेश कोळी, गणेश पाटील, गोकुळ कोळी, ललित संपले, अनिफ खान रवान, अर्चनाताई रोटे, पूजा राठोड, प्रवीण चव्हाण, पंकज महाजन, प्रकाश जोशी, शशिकांत तायडे, कैलास जाधव, सुरेश बाविस्कर, राम जाधव, समाधान निकम, रईस शहा फकीर, गुलाबराव भालेराव पाटील, मिठू ताई मुखर्जी, निखिल भारंबे, शहीद खां अतार यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहनजळगाव जिल्ह्यातील आगामी भव्य मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व तालुका व शहर अध्यक्ष, महिला पदाधिकारी, युवा पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि सभासदांनी एकजुटीने सहकार्य करावे. मेळाव्याच्या नियोजनासाठी सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती महत्त्वाची असल्याने प्रत्येकाने या कार्यक्रमाची नोंद घ्यावी, असे आवाहन जळगाव जिल्हाध्यक्ष अशोक खंडू तायडे यांनी केले.तसेच बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या ग्रुपमधून काढण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या बैठका व नियोजित कार्यक्रमांना गांभीर्याने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.बैठकीचे ठिकाण : BCM चर्चचा हॉल, हॉटेल कोळीवाडा मागे, पाडळसा रोड, तापी नदी परिसर, अकलूद, ता. यावल, जि. जळगाव.मेळाव्याची तारीख : रविवार, २२ नोव्हेंबर २०२६
आवाहनकर्ता : अशोक खंडू तायडे, जळगाव जिल्हाध्यक्ष
