मुंबई : युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलिस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी, राष्ट्रीय युवा अध्यक्ष श्री. शिवाजीराव शेलार, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. डॉ. राजेश्वर हेंद्रे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती जयश्रीताई अहिरे, राष्ट्रीय महासचिव श्री. राकेश वाघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. ह.भ.प. अवचितानंदन मधुकर महाराज तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा तथा मुंबई महिला अध्यक्षा सौ. स्मिताताई बांद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पदाधिकारी व सदस्य विविध सामाजिक व जनहिताच्या कार्यात निस्वार्थपणे योगदान देत आहेत.

गणेशोत्सव २०२६ दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांची सुरक्षितता, गर्दीचे नियोजन तसेच उत्सव शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी पोलिस प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले.या उल्लेखनीय कार्याची दखल घेत दिंडोशी पोलिस ठाणे, मुंबई यांच्या वतीने श्री. धनेश रामराखियानी यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. गणेशोत्सव काळात केलेल्या निःस्वार्थ सेवा, सामाजिक बांधिलकी, शिस्त व जबाबदारीच्या कार्याची प्रशस्तीपत्रातून दखल घेण्यात आली आहे.


ग्रेटर मुंबई टीमचे उल्लेखनीय योगदानया कार्यात श्री. धनेश रामराखियानी, सौ. स्मिता बांद्रेकर, श्री. रोहित गुप्ता, श्री. गोपाल चौधरी, श्री. उमाशंकर गुप्ता, श्री. अमोल पार्ले, श्री. विकास झाडव, श्री. संदेश, श्री. राजहासन, श्री. रविंद्र आणि सौ. दक्ष यांचे योगदान राहिले.ग्रेटर मुंबई टीमला मिळालेले हे प्रशस्तीपत्र म्हणजे एका व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण युवा क्रांती पोलिस मित्र संघटनेच्या निस्वार्थ कार्याची पावती असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.महाराष्ट्रातील ज्या-ज्या ठिकाणी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य समाजहितासाठी निस्वार्थपणे कार्य करत आहेत, त्यांनी आपल्या कार्याची दखल घेऊन अशा प्रकारचे सन्मानपत्र मिळविले पाहिजे, कारण हा सन्मान कार्यकर्त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देणारा ठरतो.ग्रेटर मुंबई टीमच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे या उल्लेखनीय कार्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
