मुंबई : प्रतिनिधी अमर पठारे
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत तीन दिवसांच्या प्रस्तावित बँक संपाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी आपल्या आवश्यक बँकिंग व्यवहारांचे नियोजन आधीच करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.भारतीय स्टेट बँकेने (SBI) ग्राहकांना संपाच्या तारखांपूर्वी आवश्यक बँकिंग व्यवहार पूर्ण करून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच रोख रकमेची आवश्यकता असल्यास ATM/ADWM सुविधांचा वापर करावा. ग्राहक सेवा केंद्रासोबतच इंटरनेट बँकिंग, YONO, मोबाइल बँकिंग, UPI आणि इतर डिजिटल बँकिंग सुविधांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान, या प्रस्तावित बँक संपाच्या पार्श्वभूमीवर युवा क्रांती फाउंडेशनचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी यांनी युवा क्रांती फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी आणि ‘युवा क्रांती कुटुंबा’तील सदस्यांना सावधगिरीचे आवाहन केले आहे.28 ते 30 सप्टेंबरदरम्यान SBI, युनियन बँक तसेच इतर सरकारी बँकांच्या संपामुळे बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांची अत्यावश्यक बँकिंग कामे आहेत, त्यांनी ती शक्य असल्यास संपापूर्वीच करून घ्यावीत. संपानंतर 1 ऑक्टोबरपासून बँकिंग व्यवहार पूर्ववत होण्याची अपेक्षा असल्याने अत्यावश्यक काम नसल्यास ग्राहकांनी अनावश्यक घाई करण्याची आवश्यकता नाही, असेही सांगण्यात आले.फ्रॉड मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहनबँक संपाच्या कालावधीत ग्राहकांना बँकेच्या नावाने बनावट मेसेज, लिंक किंवा फोन कॉल येण्याची शक्यता असल्याने प्रत्येकाने विशेष काळजी घ्यावी, असे श्री. रविंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.कोणताही संशयास्पद किंवा अनोळखी मेसेज आल्यास त्याला तात्काळ रिप्लाय करू नये. तसेच कोणत्याही परिस्थितीत OTP, PIN, पासवर्ड किंवा इतर गोपनीय बँकिंग माहिती कोणालाही देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.बँकेच्या नावाने आलेला कोणताही संदेश प्रथम व्यवस्थित वाचावा. संदेशामध्ये दिलेली लिंक किंवा माहिती संशयास्पद वाटल्यास त्यावर क्लिक करू नये अथवा उत्तर देऊ नये. आवश्यक असल्यास संबंधित बँकेच्या अधिकृत माध्यमातून माहितीची खात्री करूनच पुढील कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले.युवा क्रांती फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी तसेच नागरिकांनी बँक संपाच्या काळात चुकीच्या किंवा फसव्या संदेशांना बळी पडू नये आणि आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहावे, असे आवाहन संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी यांनी केले.

“अत्यावश्यक बँकिंग कामे शक्य असल्यास संपापूर्वी पूर्ण करून घ्या; मात्र घाईघाईत कोणत्याही अनोळखी मेसेजला उत्तर देऊ नका आणि OTP कोणालाही देऊ नका,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.

खरे आहे… सर्वांनी काळजी घ्यावी. नाहक बळी पडू नये.