कोपरगाव : युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेची अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक कोपरगाव तालुक्यात उत्साहात पार पडली. या बैठकीस संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.यावेळी सूर्यवंशी साहेबांनी आपल्या खास शैलीत मार्गदर्शन करत अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच पदाची जबाबदारी स्वीकारून निष्क्रिय असलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत आवश्यक निर्णय घेण्याचे आदेश दिले. संघटनेत आपसात ‘माझे-तुझे’ करू नका, कोणालाही कमी लेखू नका, असा महत्त्वपूर्ण सल्लाही त्यांनी दिला. बंदोबस्तासाठी जाण्यापूर्वी रजिस्टरमध्ये आवश्यक नोंद असणे गरजेचे असल्याचे सांगत संघटनेच्या कामकाजाबाबत विविध विषयांवर मार्गदर्शन केले.त्यानंतर प्रदेशाध्यक्ष ह. भ. प. मधुकर महाराज आहिरे यांनी संघटनेची बांधणी व विस्तार याबाबत मार्गदर्शन केले. अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष भाग्यराम गुजर साहेब यांनी संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व सदस्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.यावेळी उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हा प्रभारी सय्यद शेख, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख काशिनाथ गिरी, जिल्हा कार्याध्यक्ष वैद्य साहेब, कोपरगाव तालुका उपाध्यक्ष सलीम शेख, राहाता तालुकाध्यक्ष कडू पाटील, येवला तालुका महिला अध्यक्षा, नांदगाव शहर महिला अध्यक्षा, पाथर्डी तालुका पदाधिकारी, भारती ताई, निंबा चव्हाण, मोरे आदींनी आपले विचार मांडले.बैठकीस नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रमेश पवार, कळवण तालुकाध्यक्ष राजेश महाराज वाघ तसेच कळवण तालुका संपर्कप्रमुख हिरामण गावित यांनीही उपस्थिती लावली.कोपरगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी बैठक यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले. याबद्दल अहिल्यानगर जिल्हा प्रभारी सय्यद शेख यांनी सर्व पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानले. तसेच ज्यांची नावे राहिली असतील त्यांच्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.प्रतिनिधी : अमर पठारे
