• Thu. Oct 15th, 2026

Satyavartabharat Live 24x7

India #1 News Platform लेटेस्ट व ब्रेकिंग न्यूज | हिन्दी समाचार | यूपी न्यूज

इनामगावातील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; वनविभाग व रेस्क्यू टीमला यश

ByMohini Khairnar/pathare

Aug 22, 2026
Spread the love

सत्यवार्ता भारत लाइव्ह 24×7 | शिरूर (इनामगाव) : शिरूर तालुक्यातील इनामगाव परिसरात दहशत निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या अखेर वनविभाग आणि रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनंतर जेरबंद करण्यात आला. या बिबट्याने यापूर्वी तीन लहान मुलांसह एका महिलेवर हल्ला करून त्यांना ठार केले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.RFO निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने आणि रेस्क्यू टीमने नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबवत अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले.या यशाबद्दल युवा क्रांती संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रविंद्र सूर्यवंशी यांच्या वतीने वनविभाग आणि रेस्क्यू टीमचे विशेष कौतुक करण्यात आले.यावेळी युवा क्रांती संघटनेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष माननीय श्री. शिवाजी शेलार, तसेच पदाधिकारी सुनील कळसकर, शरद गदादे, मनोज चौधरी, गोविंद शेलार आणि अमोल पाटोळे उपस्थित होते.बिबट्या जेरबंद झाल्याने इनामगाव परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, वनविभाग व रेस्क्यू टीमच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्रतिनिधी : अमर पठारे

8055161616

सत्यवार्ता भारत लाइव्ह 24×7

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *